Business

Header Ads

लवकर तपासणी व निदान करत जीवनाचा दर्जा वाढवा डायबेटिक रेटिनोपॅथी मार्गदर्शकतत्त्वे मधुमेहाशी संबंधित दृष्‍टी गमावण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी उपक्रम आहेत, वेळेवर निदान झाल्‍यास या आजारावर प्रतिबंध ठेवता येऊ शकतो

नागपूर, 2 मे, 2025: भारतात १०१ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना मधुमेह असण्‍यास देश जगाची मधुमेह राजधानी ठरला आहे. परिणामत: मधुमेह-संबंधित प्रतिबंध करता येऊ शकणाऱ्या दृष्‍टी गमावण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये मोठी वाढ होताना निदर्शनास आले आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी वेळेवर तपासणी करण्‍यामध्‍ये, तसेच त्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ऑफ्थॅल्‍मोलॉजिस्‍टकडे (नेत्ररोगतज्ञ) संदर्भ करण्‍यामध्‍ये डायबेटोलॉजिस्‍ट महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटेरो रेटिनल सोसायटी ऑफ इंडिया (व्‍हीआरएसआय) आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्‍टडी ऑफ डायबेटिज इन इंडिया (आरएसएसडीआय) यांनी अद्वितीय डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रिनिंग गाइडलाइन्‍स तयार करण्‍यासाठी सहयोग केला, ज्या भारतातील प्रत्‍येक डॉक्‍टर व डायबेटोलॉजिस्‍टला त्‍यांच्‍या रूग्‍णांना डायबेटिक रेटिनोपॅथीबाबत माहिती देण्‍यास मदत करतील.

प्रशांत बावनकुळे, विठ्ठल शल्यचिकित्सक सराक्षी नेत्रालय अध्यक्ष, शैक्षणिक व संशोधन समिती अखिल भारतीय नेत्रविज्ञान समाज, नागपूर, म्‍हणाले, ''भारतात ७० दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना मधुमेह असण्‍यासह मधुमेह आपल्‍या देशासाठी मोठे आव्‍हान बदले आहे. पाचपैकी एका मधुमेही व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या रेटिनामध्‍ये संसर्ग म्‍हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) असण्‍याची शक्‍यता आहे. डीआर सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यांमधील मूक आजार आहे आणि याच कारणामुळे रेटिनाचे प्रगत नुकसान होत नाही तोपर्यंत त्‍याचे निदान होत नाही, तसेच नंतरच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये कायमस्‍वरूपी दृष्‍टीचे नुकसान होण्‍याचा धोका वाढतो. भारत सरकारने डीआरच्‍या लवकर निदानाची सुविधा देण्‍यासाठी आणि आजारामुळे होणाऱ्या विकृतीला प्रतिबंध करण्यासाठी आपल्‍या आयुष्‍मान भारत उपक्रमामध्‍ये डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीचा समावेश केला आहे. आज डॉक्‍टर, डायबेटोलॉजिस्‍ट, ऑफ्थॅल्‍मोलॉजिस्‍ट यांसारख्‍या आरोग्‍यसेवा प्रोफेशनल्‍सनी एकत्र येऊन सहयोगात्‍मक प्रयत्‍न करणे ही काळाची गरज आहे, ज्‍यामुळे सर्वसमावेशक डीआर व्‍यवस्‍थापनासंदर्भातील ही मार्गदर्शकतत्त्वे दृढ होतील आणि दृष्‍टीदोषाला प्रतिबंध होईल.''

जीवनशैलीमधील बदल, शहरांकडे स्‍थलांतर, लठ्ठपणा आणि तणावामुळे देशामध्‍ये मधुमेहाने पीडित रूग्‍णांच्‍या संख्‍येत वाढ होत आहे, यासोबत मधुमेह संबंधित दृष्‍टी गमावण्‍याच्‍या केसेसची आकडेवारी देखील वाढत आहे. टाइप-२ मधुमेह श्रमजीवी व्‍यक्‍तींमध्‍ये सामान्‍य आहे, ज्‍याचा त्‍यांचा शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर परिणाम होत आहे. वेळेवर या स्थितीची तपासणी केली नाही तर भारतात अंधत्‍वाचे प्रमाण वाढण्‍याला प्रमुख कारण ठरू शकते, परिणामत: आर्थिक भार वाढू शकतो. देशामध्‍ये १२.५ टक्‍के डायबेटिक रेटिनोपॅथी आणि ४ टक्‍के दृष्‍टी गमावण्‍याचा धोका असलेले 'डायबेटिक रेटिनोपॅथी' असण्‍यासह जवळपास ३ दशलक्ष भारतीयांना दृष्‍टी गमावण्‍याचा धोका आहे. यामधून मधुमेह असलेल्‍या प्रत्‍येक रूग्‍णाने वेळेवर तपासणी करण्‍याची महत्त्वपूर्ण गरज निदर्शनास येते, ज्‍यामुळे अपरिवर्तनीय दृष्‍टी गमावण्‍याला प्रतिबंध करता येईल. या आजाराकडे सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये दुर्लक्ष केले जाते, ज्‍यामुळे त्‍याला 'सायलेण्‍ट थीफ ऑफ साइट' म्‍हणजेच 'दृष्‍टीचा मूक चोर' म्‍हटले जाते.

ही मार्गदर्शकतत्त्वे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींचे पहिले संपर्कव्‍यक्‍ती असलेल्‍या आरोग्‍यसेवा प्रोफेशनल्‍सना लवकर निदान व हस्‍तक्षेपाला चालना देण्‍यासाठी आवश्‍यक टूल्‍स आणि माहितीसह सक्षम करतात, परिणामत: डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे होणारा तीव्र दृष्‍टीदोष व आंधळेपणाचा धोका कमी होतो.

तक्‍ता १ : भारतातील डॉक्‍टरांसाठी डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रिनिंग गाइडलाइन्‍स[1]: व्हिटेरो रेटिनल सोसायटी ऑफ इंडिया (व्‍हीआरएसआय) आणि रिसर्च सोासायटी फॉर स्‍टडी ऑफ डायबेटिज इन इंडिया (आरएसएसडीआय) यांच्‍याद्वारे स्थितीबाबत विधान विकसनशील देशांमधील प्रतिष्ठित इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिजमध्‍ये प्रकाशित करण्‍यात आलेली ही मार्गदर्शकतत्त्वे सर्वसमावेशक रेकनर म्‍हणून काम करतात आणि मधुमेह व्‍यवस्‍थापन व डायबेटिक रेटिनोपॅथीच्‍या तपासणीला प्रभावीपणे प्रगत करण्‍यासाठी भारताच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहेत.

Post a Comment

0 Comments