Business

Header Ads

ईमामी सादर करीत आहे ‘प्योर ग्लो’ त्वचेची काळजी घेणारे एक क्रांतिकारी समाधान, ब्रँड अॅतम्बॅसेडर म्हणून राशी खन्नाला आणण्यात आले आहे

कोलकाता, एप्रिल 2025 - ईमामी लिमिटेड, ईमामी ग्रुपची प्रमुख पर्सनल केअर आणि हेल्थकेअर कंपनी ईमामी लिमिटेडने ईमामी प्योर ग्लो सादर करुन ₹4000 कोटिपेक्षा जास्त उलाढालीच्या ब्राइटनिंग क्रीम कॅटेगरीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांच्या प्रमुख चिंता दूर करण्यासाठी आणि ग्लो सेग्मेंटची पुनर्परिभाषा करण्यासाठी डिजाइन केलेले एक क्रांतिकारी स्किनकेअर सोल्युशन. ब्रँडचे आकर्षण वाढविण्यासाठी आणि देशभरातील ग्राहकांशी जोडण्यासाठी, ईमामीने प्योर ग्लोचा चेहरा म्हणून राशी खन्नाला निवडले आहे. प्रादेशिक आणि हिंदी चित्रपट उद्योगात मजबूत उपस्थिती असलेली राशी खन्ना, ब्रँडमध्ये आकर्षण, आत्मविश्वास आणि सापेक्षता आणते, ज्यामुळे ती नवीन काळातील स्किनकेअर क्रांतिसाठी परिपूर्ण बनते. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे, ईमामी प्योर ग्लो हे महिलांना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले आहे, जे सध्याचे ब्राइटनिंग क्रीम्स वापरतात - जसे, पांढरा थर, मॉइश्चरायझेशनचा अभाव आणि कमीत कमीत प्रभावीपणा किंवा कालांतराने न दिसणारे परिणाम. पर्सनल केअर सेग्मेंटमध्ये त्याच्या अभूतपूर्व नवकल्पनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ईमामीने विज्ञान आणि निसर्गाची शक्ति एकत्र केली आहे. पुढ्च्या पिढीतील ब्राइटनिंग क्रीममध्ये जापानी सकुरा फुलाचे प्रभावी गुणधर्म आणि वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेले नियासिनमाइड मिसलून. हा अद्वितीय फॉरम्यूला फक्त 3 आठवड्यात दिसून येणारी चमक देतो, 50% जास्तं मॉइश्चरायझेशन देतो आणि फक्त एका आठवड्यात काळे डाग कमी करण्यास मदत करतो. 

लॉन्चच्या प्रसंगी बोलताना, मोहन गोएन्का, व्हाइस चेअरमन आणि होल-टाइम डायरेक्टर, ईमामी लिमिटेड म्हणाले, "ईमामीने बऱ्याच वर्षांपासून नाविन्यपूर्ण आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या उत्पादनांसह पर्सनल केअर कॅटेगरीमध्ये व्यत्यय आणला आहे. प्योर ग्लोसोबत, आम्ही एका प्रभावी उच्चतम, वैज्ञानिक फॉर्म्युलासह ₹4000 कोटिच्या ब्राइटनिंग क्रीमच्या बाजारात प्रवेश करीत आहोत. आम्ही ग्राहकांच्या चिंतांचा सखोल अभ्यास केला आहे आणि आमची अद्वितीय 6-मार्गी ब्राइटनिंग अॅगक्शन, डीप पेनिट्रेशन ट्केनॉलॉजी आणि नैसर्गिक घटक एक प्रभावी, दीर्घकाळ टिकणारी चमक सुनिश्चित करते. आम्हाला विश्वास आहे की प्योर ग्लो ह्या श्रेणीत एका नव्या युगाचा प्रारंभ करेल. "

प्रादेशिक आणि हिंदी चित्रपट उद्योगातील आशादायक नाव आणि ईमामी प्योर ग्लोची ब्रँड अॅ्म्बॅसेडर राशी खन्ना ही ब्रँडशी तिच्या संबंधाबद्दल म्हंणते “ईमामी प्योर ग्लोशी जोडले गेल्याचा मला खूपच आनंद आहे! मला खरोखरच असे वाटते की स्किनकेअरने विज्ञानावर आधारित राहून नैसर्गिक सौंदर्य साजरे केले पाहिजे, ज्यामुळे ते अधिक खास बनते. या उत्पादनात निसर्ग आणि नाविन्याचा एक अद्भूत मेळ आहे आणि मला याचा मऊ-हल्केपणा, त्वरित अॅपब्जॉर्बशन आणि कोणत्याही पांढऱ्या थरा शिवाय त्वचेत ताजेपणा आणि चमक आणण्याचा गुणधर्म अतिशय आवडतो. आत्मविश्वासाने सहजतेने चमकू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हे परिपूर्ण आहे.”

दक्षिण भारत आणि मुंबई आणि दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्ये प्रचंड चाहते आणि मजबूत संपर्कासह, राशी खन्ना ब्रँडमध्ये एक तरुण, महत्त्वाकांशी चेहरा जोडते, ज्यामुळे ते आजच्या ग्राहकांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनते. ग्राहकांच्या मजबूत अंतर्दृष्टी, सर्वोत्तम फॉर्म्युलेशन आणि उच्च-प्रभाव ब्रँडिंगसह, ईमामी प्योर ग्लो ब्राइटनिंग कॅटेगरीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. हा ब्रँड आता दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भारतातील निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच राष्ट्रीय स्तरावर रोलआउट होण्यासठी सज्ज आहे. ईमामी प्योर ग्लो 8 ग्राम, 15 ग्राम, 25 ग्राम आणि 50 ग्रामच्या पॅक साइजमध्ये अनुक्रमे रु. 10, 25, 65 आणि 125 मध्ये उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments