नागपूर, 7 जून 2025 : ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये अद्यापही पुरेशी जागरूकता नाही, त्यामुळे निदान उशिरा होऊन उपचारात अडथळा येतो. ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक असल्याचे मत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ब्रेन ट्युमर सर्जरी स्पेशालिस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक डॉ. कार्तिक मुलतानी यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. मुलतानी म्हणाले की, सतत डोकेदुखी, उलटी होणे, झटके येणे, दृष्टी कमजोर होणे, बोलताना तोंड अडखळणे, हातापायात कमजोरी जाणवणे यांसारखी लक्षणे अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. परंतु ट्युमर सौम्य असो की गंभीर, वेळीच निदान झाले तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरू शकते.
ब्रेन ट्युमरची लक्षणे इतर सामान्य आजारांसारखी वाटत असल्याने रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. वारंवार होणारी डोकेदुखी, अकारण येणाऱ्या उलट्या, झटके, स्वभावात बदल, बोलण्यात बदल, अडखळणं किंवा शरीराचा तोल जाणं ही लक्षणे दिसल्यास एमआरआय करून न्यूरोसर्जनचा सल्ला घेणे आवश्यक असल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरतर्फे देण्यात आली.
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये डॉ. कार्तिक मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली ब्रेन ट्युमर सर्जरीसाठी प्रगत उपकरणांचा वापर केला जातो. त्यामध्ये इन्ट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड (शस्त्रक्रियेदरम्यान मार्गदर्शनासाठी), फ्लुओरेसिन-गाईडेड सर्जरी (ट्युमर सेल व सामान्य सेल यामधील फरक समजण्यासाठी), इन्ट्राऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटरिंग (आयओएनएम) (मेंदूच्या संवेदनशील भागांचे संरक्षण) आणि एंडोस्कोपिक ट्युमर रीसक्शन यांचा समावेश आहे.
विदर्भातील एकमेव न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक डॉक्टर
डॉ. कार्तिक मुलतानी हे विदर्भ आणि मध्य भारतातील एकमेव न्यूरोसर्जन आहेत ज्यांनी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून न्यूरो-ऑन्कोलॉजीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ते अत्यंत गुंतागुंतीच्या ब्रेन ट्युमर सर्जरी अचूकतेने आणि सुरक्षितपणे करतात.
ब्रेन ट्युमरवर उपचार घेण्यास अनेकांना भीती वाटते, तसेच समाजात याबाबत गैरसमजही आहेत. जनजागृती आणि वेळीच निदान झाल्यास रुग्णांचे आयुष्य वाचू शकते आणि उपचार अधिक प्रभावी होतात, असे डॉ. मुलतानी यांचे म्हणणे आहे. ब्रेन ट्युमरचे गांभीर्य लक्षात घेता वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी तज्ञांची टीम रुग्णांना सहानुभूतीपूर्ण उपचार देण्यात अग्रणी आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे सर्व सुविधा 24x7 उपलब्ध असतात.
0 Comments