Business

Header Ads

कोटक सिक्युरिटीजतर्फे कोटक स्टॉकशाळेचा शुभारंभ - एक मोफत बहुभाषिक व्हिडिओ आणि मजकूरावर आधारित शैक्षणिक मंच !

थोडक्यात पण महत्त्वाचे

शैक्षणिक मंचाच्या माध्यमातून नवीन व अनुभवी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी ब्रोकरेज फर्मव्दारे आर्थिक शिक्षण अधिक सोपे आणि सुलभ

मुंबई, 21 जून 2025 : भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज घराण्यापैकी एक असलेल्या कोटक सिक्युरिटीजने देशभरातील गुंतवणूकदार तसेच शेअरबाजारात समभाग आणि वायदा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना (ट्रेडर्स) भांडवल बाजाराचे शिक्षण देण्यासाठी 'कोटक स्टॉकशाळा' या मोफत बहुभाषिक शिक्षण मंचाचा प्रारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. कोटक निओ ॲपवरही हा मंच उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

हा मंच दोन स्वरूपात उपलब्ध आहे:

१. व्हिडिओ-आधारित अभ्यासक्रम: हा त्रिस्तरीय अभ्यासक्रम असून त्यामध्ये लहान आणि सहज समजण्यायोग्य प्रकरणे आहेत. त्यात प्रामुख्याने मूलभूत आणि प्रगत संकल्पना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. हा अभ्यासक्रम सध्या हिंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. तो लवकरच इंग्रजीमध्ये सुरु केला जाणार आहे. 

२. मजकूर-आधारित अभ्यासक्रम: समजण्यास अतिशय सोप्या असलेल्या २०० हून अधिक प्रकरणांमध्ये हा व्यापक अभ्यासक्रम विभागलेला आहे. तो इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अतिरिक्त प्रादेशिक भाषेतही हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. 

भारतात मार्च २०२५ पर्यंत ४.९२ कोटींहून अधिक सक्रिय डीमॅट खातेधारक आहेत. त्यामुळे बहुस्तरीय आणि व्यावहारिक गुंतवणूक शिक्षणाच्या पर्यायांची गरज वाढवली आहे. भारताच्या विविध प्रदेशातून शेअरबाजारात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना कोटक स्टॉकशाळा आर्थिक साक्षरता तसेच भांडवली बाजारांबाबत उच्च-गुणवत्तापुर्ण तसेच समजण्यास सोपी, सुटसुटीत व सुलभ सामग्री उपलब्ध करुन देत ही मागणी पूर्ण करत आहे.
या नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्यासपीठाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह म्हणाले की, "आर्थिक सक्षमीकरणाचा प्रारंभ ज्ञानापासून सुरू होतो, यावर कोटक सिक्युरिटीजचा ठाम विश्वास आहे. आमचे नवीन शैक्षणिक व्यासपीठ कोटक स्टॉकशाळेमध्ये व्यापक व्हिडिओ आणि मजकूर-आधारित मोफत सामग्री आहे. या सुविधेतून आम्ही प्रत्येक भारतीयासाठी, मग त्यांची पार्श्वभूमी किंवा अनुभव काहीही असो, गुंतवणूक शिक्षण अतिशय सुलभ आणि सोपे करत आहोत. अतिशय जटिल संकल्पना कोणीही समजू शकेल आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करू शकेल, अशा सोप्या, आकर्षक धड्यांमध्ये विभागून आत्मविश्वासू गुंतवणूकदारांना ज्ञानी करणे हे आमचे ध्येय आहे."

भांडवली बाजारातील ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी कोटक स्टॉकशाळेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सला त्यांची गुंतवणूक आणि शेअरबाजाराबाबतची समज अधिक विस्तृत होईल. तसेच त्यांचा गुंतवणूक प्रवास प्रदीर्घ काळ सुरु राहण्यास मदत होईल. वर्षाच्या अखेरीस 10 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यासाठी या मंचाचा विस्तार करण्याचे फर्मचे उद्दिष्ट आहे.

कोटक सिक्युरिटीजचे अध्यक्ष आणि मुख्य डिजिटल व्यवसाय अधिकारी आशिष नंदा म्हणाले, “आजच्या गतिमान आर्थिक परिस्थितीत, सतत शिकणे हा केवळ एक फायदा नव्हे तर ती एक गरज आहे. आमचा नवीन मंच नवख्या आणि अनुभवी ट्रेडर्सना सेवा पुरविण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. बाजारात प्रथमच प्रवेश करणाऱ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही विविध स्तरात त्यांना समजण्यास सोपी शैक्षणिक सामग्री प्रदान करत आहे. तर अनुभवी ट्रेडर्सची धोरणे सुधारण्यासाठी आणि बाजारातील प्रवाहांच्या ते सदैव पुढे राहण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रगत मॉड्यूल तयार करण्याची योजना आखत आहोत. प्रत्येक गुंतवणूकदाराला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाने सक्षम करण्याची आमची वचनबद्धता या उपक्रमातून प्रतिबिंबित होते.”

हे शैक्षणिक मॉड्यूल नवखे, मध्यम अनुभवी आणि प्रगत स्तरांवरील कार्यरत व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेले आहे आणि ते गुंतवणूकदार त्याचबरोबर ट्रेडर्ससाठी आर्थिक साक्षरता आणि भांडवली बाजार असे संपूर्ण विश्व व्यापते.

Post a Comment

0 Comments