Business

Header Ads

संकटातून सुटका : शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये बहुविशेषज्ञांच्या टीमवर्कने आई आणि बाळाचे प्राण वाचवले !

नागपुर : 1020 बेडची सुविधा असलेल्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागाने वैद्यकीय कौशल्य व बहुविशेषज्ञांच्या सुसंवादात्मक कार्याच्या जोरावर एक अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या प्रसूतीतील आपत्कालीन प्रसंग यशस्वीरित्या हाताळला. या उपचारांतून एक तरुण माता आणि तिचे नवजात बाळ दोघेही सुरक्षितपणे बरे होऊन घरी परतले. ही घटना शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या गुणवत्तापूर्ण आणि सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवेच्या निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण ठरली.

26 वर्षीय गर्भवती महिलेला, गर्भधारणाच्या 32व्या आठवड्यात, ताकळघाट येथून शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या 300 बेडच्या समर्पित शालिनीताई माता व बाल विभाग मध्ये अतिशय गंभीर अवस्थेत आणले गेले होते. ईक्लॅम्प्सियामुळे पीडित असलेल्या या महिलेचा रक्तदाब नियमनात राहिलेला नसल्यामुळे श्वासावरोध होऊन तिला हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता.

डॉ. स्नेहल देशमुख (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि डॉ. प्रियांका कांगले (भूलतज्ज्ञ) यांनी प्रसूती कक्षात तत्काळ रुग्णाला जीवनदान देण्यासाठी पुनर्जीवन प्रक्रिया सुरु केली आणि रुग्णाला यशस्वीरित्या स्थिर केले. तत्काळ रुग्णाला उच्च-जोखमीच्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी तिला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. स्नेहल देशमुख, डॉ. शश्वती घोष, व डॉ. शांतनू शेम्बाळकर यांनी, डॉ. राजसी सेनगुप्ता (विभागप्रमुख – स्त्रीरोग व प्रसूती) यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. प्रियांका कांगले यांच्या भूलसेवेच्या सहकार्याने पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर मातेला पोस्टेरियर रिव्हर्सिबल एन्सेफालोपॅथी सिंड्रोम (PRES), सेरेब्रल व्हेनस थ्रोम्बोसिस आणि पेरिपार्टम कार्डियोमायोपॅथी यासारख्या दुर्मीळ गुंतागुंतींचा सामना करावा लागला. या परिस्थितीत सातत्यपूर्ण, समन्वयपूर्ण आणि तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय हस्तक्षेपाची नितांत गरज होती.

डॉ. हेमंत देशपांडे आणि डॉ. राकेश भैसारे यांच्या नेतृत्वाखालील क्रिटिकल केअर टीम- डॉ. राहुल डागा, डॉ. समृद्धी तायडे, डॉ. अनिताभ सुखदेवे, डॉ. अमित सुथार व डॉ. मसूम बिरंजन यांनी 24 तास अतिदक्षता सेवा दिली. डॉ. अंजली बोरकर (प्रमुख – भूलतज्ज्ञ विभाग) यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज्ञ टीमने शस्त्रक्रियेपूर्व आणि शस्त्रक्रियेनंतरची परिपूर्ण सेवा दिली.

तिच्या पेरिपार्टम कार्डिओमायोपथीच्या उपचारासाठी विशिष्ट उपचार योजना तयार करणारे हृदयतज्ज्ञ डॉ. अभय तिडके आणि डॉ. राहुल बारई यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार उपचार करण्यात आले, तर मेंदूविकाराशी संबंधित गुंतागुंतींचे कुशल व्यवस्थापन न्युरोलॉजिस्ट डॉ. जीवन किंकर यांनी केले.
त्याचवेळी नवजात बाळाला डॉ. सी. बोकाडे (प्रमुख – बालरोग विभाग) व डॉ. कुश झुंझुनवाला यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञांच्या विभागाने अत्यंत काळजीपूर्वक सेवा दिली. ज्यामुळे त्याच्या आयुष्याची सुरुवात आरोग्यदायी झाली.

रुग्ण जवळपास दोन महिने डॉक्टरांच्या 
देखरेखीखाली होती. सातत्यपूर्ण निरीक्षण, अतिदक्षता सेवा आणि विभागीय समन्वयामुळे तिला व्हेंटिलेटरवरून हळूहळू हटवण्यात आले आणि अखेरीस ती शुद्धीवर आली आणि तिला स्थिर स्थितीत घरी सोडण्यात आले. यामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला आणि उपचार करणाऱ्या टीमला अत्यंत समाधान मिळाले.

या संपूर्ण प्रक्रियेत उत्कृष्ट नर्सिंग आणि पॅरामेडिकल सेवांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. सीमा सिंग (नर्सिंग डायरेक्टर) आणि सिस्टर विशाखा मून (एएनएस) यांच्या नेतृत्वाखाली सिस्टर सुषमा सेन, सिस्टर भाग्यश्री, सिस्टर प्रितिका, सिस्टर ज्योती आणि इतर नर्सिंग कर्मचाऱ्यांनी सहानुभूतीपूर्ण व ममतेने रुग्णसेवा दिली. ज्यामुळे तिचा सर्वांगीण आणि प्रभावी उपचार झाला. रुग्णाच्या कुटुंबाने संपूर्ण शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर टीमचे मन:पूर्वक आभार मानले.

डॉ. अनुप मरार, डायरेक्टर, डीएमआयएचईआर (डीयू) ऑफ-कॅम्पस यांनी सांगितले: “ही विलक्षण केस कुशल टीमवर्क आणि एकसंध दृष्टिकोनातून काय साध्य होऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. ही केस विविध विभागांमधील समन्वयाचे सामर्थ्य आणि एसएमएचआरसीमधील क्लिनिकल उत्कृष्टतेची दृढ परंपरा अधोरेखित करते. अशा घटना आपल्याला प्रत्येक रुग्णाच्या प्रवासात दर्जा अधिक उंचावण्याची प्रेरणा देतात.”

डॉ. वसंत गावंडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एसएमएचआरसी म्हणाले:“ शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील प्रसूती व स्त्रीरोग विभागाने केवळ पाच वर्षांत गुंतागुंतीच्या आणि उच्च जोखमीच्या प्रसूती केसमध्ये यशस्वीरित्या काम करून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. आमच्या रुग्णालयात दररोज वाढत असलेल्या यशस्वी प्रसूतींचा दर हाच आमच्या निष्ठेचा आणि परस्पर सहकार्याचा पुरावा आहे.”

ही विलक्षण यशोगाथा शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञता, सहानुभूती आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून आशा निर्माण करण्याच्या कृतीशील दृष्टिकोनाला मूर्त रूप देते.

छायाचित्र

Post a Comment

0 Comments