थोडक्यात पण महत्त्वाचे
- या पंचवार्षिक सहयोगाचा प्रायोजित संशोधन प्रकल्प, सल्लागार प्रकल्प, तंत्रज्ञान परवाना, प्रशिक्षण, सुविधा विकास आणि विद्यार्थी फेलोशिप्स देण्याचा मनसुबा आहे
- या सहयोगासह सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाने सहयोगात्मक संशोधनाला चालना देण्यासाठी, तंत्रज्ञान विकासाला गती देण्यासाठी आणि भविष्यासाठी सुसज्ज टॅलेंटला आव्हानांचे निराकरण करण्यास सक्षम करण्यासाठी आपल्या उद्योग-शैक्षणिक सहभागाला दृढ केले आहे
- हा सहयोग भारतीय भाषा, हेल्थ टेक आणि उदयोन्मुख क्षेत्रे जसे जनरेटिव्ह एआयसाठी एआयमध्ये अग्रगण्य सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करेल
गुरूग्राम, भारत, जून , 2025 : सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-एन)ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास)सोबत सामंजस्य करार करत आपला उद्योग-शैक्षणिक सहभाग दृढ केला आहे. या सहयोगांतर्गत सहयोगात्मक संशोधनाला चालना देण्यात येईल, तंत्रज्ञान विकासला गती देण्यात येईल आणि भविष्यासाठी सुसज्ज टॅलेंटना निपुण करण्यात येईल. हा सहयोग भारतीय भाषा, हेल्थ टेक आणि उदयोन्मुख क्षेत्रे जसे जनरेटिव्ह एआयसाठी एआयमध्ये अग्रगण्य सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यासह 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया' दृष्टिकोनाशी संलग्न प्रबळ इनोव्हेशन इकोसिस्टम निर्माण करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ होईल.
या पंचवार्षिक सामंजस्य करारावर एसआरआय-एनचे व्यवस्थापकीय संचालक क्यूनग्यून रू आणि आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्ही. कामाकोटी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कराराचा सहयोगात्मक क्रियाकलापांची व्यापक श्रेणी प्रदान करण्याचा मनसुबा आहे, जसे प्रायोजित संशोधन प्रकल्प, सल्लागार प्रकल्प, तंत्रज्ञान परवाना, प्रशिक्षण, सुविधा विकास आणि भविष्यात विद्यार्थी फेलोशिप्सची स्पॉन्सरशिप.
''एसआरआय-एनमध्ये आम्ही सतत तंत्रज्ञान निर्माण करण्याप्रती काम करत आहोत, जे व्यक्ती व समुदायांना सक्षम करतात. आयआयटी मद्राससोबतचा आमचा सहयोग एकत्रितपणे अर्थपूर्ण, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सुसज्ज सोल्यूशन्स निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एकत्रित, आमचा भारतातील प्रादेशिक भाषांच्या सखोल एकीकरणासह गॅलॅक्सी एआय इकोसिस्टम सुधारण्याचा आणि देशभरातील भाषेसंदर्भातील अडथळ्यांना दूर करण्याप्रती योगदान देण्याचा मनसुबा आहे. तसेच, आम्ही उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या सहयोगाने विकास आणि कौशल्य सुधारणेमध्ये सामील होत आहोत,'' असे सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचे व्यवस्थापकीय संचालक क्यूनग्यून रू म्हणाले.
आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्ही. कामाकोटी या सहयोगाबाबत उत्साह व्यक्त करत म्हणाले, ''आम्हाला एसआरआय-एनसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो आणि हा सहयोग एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत क्रांतिकारी संशोधन व तंत्रज्ञान विकासाला प्रायोजित करेल. झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात हा सामंजस्य करार लाभार्थींना सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक उद्योग सोल्यूशन्समध्ये पक्के संबंध विकसित करण्यास अपस्किल करेल, जे जोखीमांना दूर करण्यासाठी आणि अनिश्चिततांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक आहे.''
सॅमसंग इंडिया आणि आयआयटी मद्रास यांच्यामधील हा धोरणात्मक सहयोग एसआरआय-नोएडाच्या शैक्षणिक सहयोगांच्या वाढत्या नेटवर्कमध्ये अधिक भर करतो, जेथे आधीच आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर, आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी रोपार अशा प्रमुख संस्थांसोबत दीर्घकालीन धोरणात्मक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सॅमसंग आणि या संस्था स्मार्टर, अधिक कनेक्टेड विश्व घडवण्याच्या दिशेने विस्तृत रोडमॅप आखत आहेत. उद्योगामधील संसाधने आणि शैक्षणिक सर्वोत्तमतेला एकत्रित करत हे सहयोग भावी ब्रेकथ्रूंसाठी संपन्न इकोसिस्टम घडवत आहेत.
एसआरआय-नोएडा संशोधन व विकास (आरअँडडी) प्रकल्पांना प्रायोजित करेल. हे प्रकल्प आयआयटी मद्रास, कंपनीच्या परिसरामध्ये किंवा दोन्ही ठिकाणी सहयोगात्मक व्यवस्थापनाच्या माध्यमातून राबवण्यात येती
0 Comments